Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मोलगी येथील अल्फाबेट स्कूलमध्ये धरतीआबा बिरसा मुंडा पुण्यतिथी साजरा

मोलगी दि १०(प्रतिनिधी) अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मूळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मिडियम स्कूल मोलगी येथे आदिवासी जननायक व धरतीआबा म्हणून ओळखले जाणारे बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी साजरा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामसिंग वसावे होते तर अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक ईश्वर वसावे हे होते.
      कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारक व धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक गोटूसिंग वळवी यांनी केली. त्यात त्यांनी बिरसा मुंडा यांच्या क्रन्तिकारी जीवनकार्यावर माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि रामसिंग वसावे यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याच्या सहकार्याने प्रेरणा आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. 
           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका मनीषा वसावे, मथुरा वसावे, शेवंती वसावे, शीतल वसावे, वेदिका वसावे, लक्ष्मी वसावे, हीराबाई वसावे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनीषा वसावे तर आभार लीला पाडवी यांनी मानले.