तळोदा दि.२५ (प्रतिनिधी) राणा प्रताप इंग्लिश स्कूल प्रतापपुर शाळेत मुख्याध्यापक हेमलाल पुरुषोत्तम मगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेना(इको क्लब) यांच्या मार्फत पर्यावरण पूरक गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक हेमलाल पुरुषोत्तम मगरे ,केंद्र प्रमुख श्रीमती रंजना निकुंभे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर शाळेचे मुख्याध्यापक हेमलाल पुरुषोत्तम मगरे सरांच्या हस्ते श्रीमती रंजना निकुभे व श्री बोरसे सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्या नंतर कु मनाली पाटील,कु अश्विनी मराठे,विवेक ठाकरे,कोमल चव्हाण, सलोनी वाढणे या विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून गणपती बनवले.या वेळी पर्यवेक्षक ए एन चौधरी ,प्रतापपुर केंद्राचे केंद्र प्रमुख श्रीमती रंजना निकुभे तसेच जि प शाळा रांजणीं शाळेचे मुख्याध्यापक श्री बोरसे उपस्थित होते.सुत्र संचालन श्रीमती व्ही ए पाटील यांनी केले तर आभार श्रीमती एस एस चौधरी यांनी व्यक्त केले
या कामी शाळेतील सांस्कृतिक समितीचे सहकार्य लाभले.या शाळेतील सर्व शिक्षक बंधू व भगिनी उपस्थित होते.