Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत शहादा येथे विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

शहादा दि ३०(प्रतिनिधी) तालुक्यातील कर्जोत,आमोदा,औरंगपुर व सारंगखेडा या गावातील ग्राम पंचायत सदस्यसह विविध पक्ष व सक्रीय संघटनेचे पदाधिकारी सह दीडशे कार्यकर्त्यांचा जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश करण्यात आला.

        शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या प्रयत्नाने शहादा तालुक्यातील कर्जोत येथील ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सोनवणे,संतोष गिरासे (ग्रा.प. सदस्य), गणेश मोरे (ग्रा.प. सदस्य),भरत मुसलदे,आमोदा येथील प्रदीप पाडवी राहुल जायसवाल,देवानंद पवार,गोविंद निकुम,औरंगपुरा येथील ग्रामपंचायत सदस्य मिथुन ठाकरे,एकनाथ ठाकरे,विजय ठाकरे,विशाल शेगनाथ,राजेश बर्डे तसेच सारंगखेडा येथील विलास चौधरी,रावबा सोनवणे,महेंद्र पाटील या प्रमुख कार्यकर्ते सह दीडशे कार्यकत्यांनी शहादा येथील शिवसेनेच्या जन संपर्क कार्यालयात दिनांक २९/०८/२०२५ रोजी जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला.
       यावेळी नंदुरबार पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम वळवी,देवमन पवार,किशोर पाटील शिवसेना जिल्हा उप प्रमुख डॉ.राजेंद्र पेंढारकर, शिवसेनेचे जेष्ठ नेते जाहिर भाई शेख, शिवसेनेचे जेष्ठ नेते सुपडू खेडकर,शिवसेनेचे शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल,शिवसेना शहादा शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे,युवा सेना जिल्हा उप प्रमुख राजरत्न बिरारे,शिवसेना महानगर प्रमुख लोटन धोबी,संतोष वाल्हे, हिरालाल अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात केलेल्या सर्वांचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वागत करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
         या प्रसंगी विशाल पावरा, जयसिंग ठाकरे,लक्ष्मण पवार, हितेंद्र वर्मा,मनोज पाथरवट अँड.लहू लोहार,दिलीप पवार गणेश माळी,आनंदा पानपाटील, डॉ.विजय गायकवाड,राजेंद्र गायकवाड,प्रवीण सैंदाणे, गुलाब सुतार,प्रवीण बोर्देकर,जगदीश ठाकरे,जैकी शिकलीकर,नितीन चौधरी,विजय महाले,महेश पाटील सह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.