नांदरखेडा ता शहादा येथील गंगोत्री फार्म वनश्री उद्यानांत शहादा तालुका जेष्ठ नागरिक संघ व लोकमान्य जेष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित जिल्हा जेष्ठ नागरिक संवाद मेळावा प्रसंगी ते आजच्या सभेचे अध्यक्षस्थानांवरून बोलत होते,
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे येथील खानदेश प्रादेशिक विभाग धुळे समिती समन्वयक ॲड. एम.एस. पाटील, समिती सदस्य सेवानिवृत्त अभियंता राजेंद्र पाटील,फेस्कॉम कार्यकारणी सदस्य रामजी पाटील, जिल्हाध्यक्ष प्रताप चव्हाण, डॉ. शंशाक कुलकर्णी, अँड गोविंद पाटील, गोपीचंद पाटील, मीराबाई सोनवणे, लीलाबाई रामजी पाटील, अलकाबाई चौधरी, शीलाबाई पाटिल आदी उपस्थित होते. मान्यवरांचा हस्ते दिप प्रज्वलन करुन. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अँड राधाकृष्ण भट यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, अँड एम एस पाटील, प्रताप चव्हाण, यांनी मार्गदर्शन केले, प्रास्ताविक मध्ये रामजी पाटील यांनी जेष्ठ संघाचे कार्य, विविध योजनांची माहीती त्याचबरोबर प्रत्येक गावात जेष्ठ नागरिक संघ स्थापन करण्याबाबत आवाहन करण्यात आले. सभेला नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व इतर सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभा सुरू होण्याच्या पूर्वी साने गुरुजींची प्रार्थना खरा तो एकची धर्म या सामूहिक रित्या प्रार्थनेने वातावरण भारावून गेले . निसर्गरम्य अशा वातावरणात सभेची सुरुवात करण्यात आली.
सुत्रसंचलन निवृत्त प्राचार्य जे डी पटेल यांनी शब्द सुमनांनी हास्यमय वातावरणात केले , तर आभार रघुनाथ बेलदार यांनी मानले . पसायदान गायन करून सभा समारोप केला आणि मोतीलाल तात्यासाहेब यांच्या तर्फे सुरुची भोजनाच्या ज्येष्ठांनी स्वाद घेतला .